अमेरीका आणि आशियाई बाजारातील खराब सुरुवातीचा फटका भारतीय बाजाराला बसला आहे.



आज शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली.



सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला, निफ्टी 40 अंकांनी खाली आला आहे.



शेअर बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 82.84 वर उघडला



जागतिक बाजारातून कोणतेही सकारात्मक संकेत न मिळाल्याने भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली



आजच्या शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आहे.



शेअर बाजारात बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 115.91 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 60,811.52 वर उघडला



दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 40 अंकांनी खाली आला आहे.



चीनमधील कोव्हिड प्रतिबंधात्मक नियम शिथिल केल्यानंतर कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा वधारल्याचे पाहायला मिळाले.



ओएनजीसी, हिंदाल्को, इन्फोसिस, एचसीएल टेकसारख्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.