भारतीय शेअर बाजारात सोमवारी दिसलेली तेजी आजही कायम दिसत आहे
मेटल (Nifty Metal), आयटी (IT), बँकिंग सेक्टरमध्ये (Banking) खरेदीचा जोर दिसून येत असल्याने शेअर बाजार वधारला आहे.
प्री-ओपनिंग सत्रातही बाजारात तेजी दिसून आली होती
त्यानंतर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीचा ओघ कायम दिसत आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 295 अंकांच्या तेजीसह 60,861.41 अंकांवर खुला झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 75 अंकांच्या तेजीसह 18,089.80 अंकांवर खुला झाला
सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 99 अंकांच्या घसरणीसह 60,466.67 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी निर्देशांक 22.30 अंकांच्या घसरणीसह 17,992.30 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 16 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत आहे
14 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 32 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे