मागील काही दिवस शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीला आज लगाम लागला
सेन्सेक्सने 57 हजार आणि निफ्टीने 17 हजार अंकांचा टप्पा ओलांडला
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 492.71 अंकांनी वधारत 57,090 अंकांवर खुला
एनएसईचा निफ्टी निर्देशांक 157.45 अंकांनी वधारत 17,016 अंकावर खुला
सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 419 अंकांनी वधारत 57,017.91 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी निर्देशांक 125 अंकांनी वधारत 16,984.45 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समधील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी असल्याचे दिसून आले
पाच शेअरच्या दरात घसरण दिसून आली
निफ्टी 50 मधील 47 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली
मागील काही दिवस पडझड झालेल्या बँक निफ्टीत आज तेजी दिसून आली