RBI चलनविषयक धोरण समितीची बैठक 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आरबीआय गर्व्हनर 30 सप्टेंबर रोजी पतधोरण जाहीर करतील या बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा व्याज दरवाढ करण्याची शक्यता आहे महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआयने मे महिन्यापासून आत्तापर्यंत रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली यामुळे रेपो रेट 4 टक्क्यांवरुन 5.40 टक्के इतका झाला आहे. रेपो दरात वाढ झाल्यास व्याज दरात वाढ होणार. यामुळे विविध प्रकारची कर्जे महागतील. परिणामी ईएमआयमध्ये वाढ होणार. रेपो दरवाढीमुळे कर्जे महाग झाली तरी, Fixed Deposit वरील व्याज दरात वाढ होईल. मागील बैठकीत RBI ने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केली होती. महागाईचा दर अद्यापही सहा टक्क्यांहून अधिक असल्यामुळे व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे