शेअर बाजारात आजही तेजीचे संकेत दिसत आहेत
आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून येत आहे
आज बँकिंग शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टीने 40500 अंकांचा टप्पा ओलांडला
सेन्सेक्सने बाजार सुरू होताच 60 हजार अंकांचा टप्पा गाठला. त्यानंतर काहीशी घसरण झाली.
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स 357.53 अंकांनी वधारत 60,045 अंकांवर खुला झाला
एनएसईचा निफ्टी 124.60 अंकांनी वधारत 17,923 अंकांवर खुला झाला
सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर निर्देशांकात विक्रीमुळे घसरण झाली
सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 260 अंकांच्या तेजीसह 59,948.78 अंकावर व्यवहार करत होता
निफ्टी 91 अंकांच्या तेजीसह 17,890.10 अंकांवर व्यवहार करत होता
शेअर बाजारात मोठी उसळी