आज भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली
बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला
आज शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 659 अंकांनी वधारून 59,688 अंकावर बंद झाला
एनएसईचा निर्देशांक निफ्टीमध्ये 174 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी निर्देशांक 17,798 अंकांवर बंद झाला
बँक निफ्टीमध्ये आज चांगलेच तेजीचे वातावरण होते
बँक निफ्टीतील 12 पैकी 11 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. तर उर्वरित एका शेअरमध्ये घसरण झाली
बँकिंगशिवाय, आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये खरेदी दिसून आली
मेटल्स, ग्राहकोपयोगी वस्तू, फार्मा, मीडिया सेक्टरमध्ये विक्रीचा जोर
मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्येही तेजी
निफ्टी 50 मधील 37 शेअर्समध्ये तेजी दिसून आली