शेअर बाजारात आजही घसरण सुरुच असून आजही विक्रीचा जोर दिसून आला
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 168 अंकांची घसरण झाली
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 31 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.28 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,028 अंकांवर स्थिरावला
निफ्टीमध्ये 0.18 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,624 अंकांवर पोहोचला
बँक निफ्टीमध्येही 210 अंकांची घसरण होऊन तो 39,455 अंकांवर स्थिरावला
आज एकूण 2073 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1289 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
एकूण 121 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही
ऑटो आणि रिअॅलिटी इंडेक्समध्ये आज विक्री झाली
डॉलरच्या तुलनेत आजही रुपयामध्ये सहा पैशांची घसरण झाली असून रुपयाची किंमत 79.90 इतकी झाली आहे