शेअर बाजाराची सुरुवात सावधपणे झाली आहे
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स200 अंकांनी वधारला.
ऑटो, बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील शेअर दरात तेजी असल्याचे दिसून येत आहे.
सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 348 अंकांनी वधारत 59,151.47 अंकावर व्यवहार सुरू होता
निफ्टी 86 अंकांच्या तेजीसह 17,625.55 अंकांवर व्यवहार करत होता
एसजीएक्स निफ्टीमध्ये घसरण दिसून आल्याने भारतीय शेअर बाजारातही घसरण होईल असे संकेत होते
एसजीएक्स निफ्टीतील घसरणीनंतरही भारतीय शेअर बाजार वधारला. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारले
आयटीसीच्या शेअर दरात एक टक्क्यांची तेजी असल्याचे दिसून येत आहे
एशियन पेंट्स, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, डॉ. रेड्डीज लॅब, एमअॅण्डएम, पॉवरग्रीड. मारुती सुझुकीच्या शेअर दरात घसरण असल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली