सोमवारी झालेल्या जोरदार विक्रीनंतर आज बाजारात खरेदीचा जोर दिसून येत आहे
भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात तेजीने झाली
बाजार सुरू होताच सेन्सेक्स300 अंकांनी तर, निफ्टी100 अंकांनी वधारला
प्री-ओपनिंग सत्रात बाजारात तेजी राहणार असल्याचे संकेत दिसून आले
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 287 अंकांनी वधारत 58259 अंकांवर खुला झाला
तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 101 अंकांनी वधारत 17414 च्या पातळीवर खुला
सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 505 अंकांनी वधारला असून 58,478.03 अंकांवर व्यवहार करत आहे
तर, निफ्टीत 165 अंकांची तेजी दिसत असून 17,478.35 अंकांवर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 29 शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे
भारती एअरटेलच्या शेअर दरात घसरण झाली आहे. तर, निफ्टी 50 पैकी 49 शेअर्सचे दर वाढले आहेत