शेअर बाजारात दोन दिवस दिसत असलेल्या तेजीला आज ब्रेक लागला
नफावसुलीने शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून येत आहे
प्री-ओपनिंगमध्ये दिसून आलेली घसरण बाजार सुरू झाल्यानंतरही कायम राहिली
बँक निफ्टीतही (Bank Nifty) घसरण झाली आहे. अमेरिकन शेअर बाजारातही एक टक्क्यांची घसरण झाली
त्याचा परिणाम जागतिक शेअर बाजारावरही दिसून आला आहे
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स 215.60 अंकांच्या घसरणीसह 59,504 अंकांवर खुला झाला
शिवाय, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 49.90 अंकांच्या घसरणीसह 17,766 अंकावर खुला
सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 118 अंकांच्या घसरणीसह 59,601.17 अंकांवर व्यवहार करत होता
48.40 अंकांच्या घसरणीसह 17,767.85 अंकावर व्यवहार करत होता
सेन्सेक्समधील 30 पैकी 18 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे