आज 20 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. त्याच्या परिणामी बाजारात तेजी दिसली.



सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडण्यास यश मिळवले. मात्र, काही वेळेनंतर नफा वसुली झाल्याने बाजारात घसरण दिसून आली.



बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स (Sensex) 578 अंकांनी वधारत 59,719 अंकांवर बंद झाला.



निफ्टी (Nifty) 194 अंकांनी वधारत 17,816 अंकांवर बंद झाला.



बँकिंग सेक्टर, ऑटो, आयटी, फार्मा, FMCG, मीडिया, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टर, एनर्जी, मेटल्स सेक्टरमध्ये शेअर बाजारात तेजी दिसून आली.



सन फार्मा, डॉ. रेड्डी लॅब, टाटा स्टील, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्समध्ये तेजी दिसून आली.



नेस्ले, आयटीसी, इन्फोसिस आदी शेअर दरात घसरण दिसून आली.



आज शेअर बाजाराचे बाजार भांडवल मूल्य 283.32 लाख कोटी रुपये इतके झाले.



निफ्टीतील 50 कंपन्यांपैकी 44 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, सहा शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.



सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 24 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, सहा शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.