RBI ची तीन दिवसीय पतधोरण आढावा बैठक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर पुन्हा एकदा 7 टक्क्यांच्या पातळीवर पोहचला होता आंतरराष्ट्रीय वित्तीय फर्म मॉर्गन स्टॅनलीने RBI व्याज दरात वाढ करण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार, आरबीआय रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता याआधी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 1.40 टक्क्यांची वाढ केली आहे सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दर हा 7.1 टक्के ते 7.4 टक्के इतका राहू शकतो. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत महागाई दरात घट होऊ शकते. जानेवारी-फेब्रुवारी 2023 या कालावधीत किरकोळ महागाई दर हा 6 टक्क्यांच्या आसपास राहू शकतो कमोडिटीच्या किंमती वाढ आणि डॉलरच्या तुलनेते रुपया कमकुवत होत असल्याने आयात महाग होण्याचा धोका याच्या परिणामी महागाई दर वाढण्याची भीती आहे