भारतीय शेअर बाजारात आज खरेदीचा जोर असल्याचे दिसून येत आहे
प्री-ओपनिंगमध्ये निफ्टीने 18 हजार अंकाचा टप्पा ओलांडला. निफ्टीने दुसऱ्यांदा हा टप्पा गाठला आहे
बँकिंग शेअरमध्ये असलेल्या तेजीने शेअर बाजार वधारला असल्याचे दिसून येत आहे
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 293.16 अंकांनी वधारत 60,408 अंकांवर खुला झाला
तर, एनएसई निर्देशांक निफ्टी (Nifty) 108.10 अंकांनी वधारत 18,044 अंकांवर खुला झाला
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 423 अंकांच्या 60,538.86 अंकावर व्यवहार करत होता
निफ्टी 122 अंकांनी वधारत 18,058.40 अंकांवर व्यवहार करत होता
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये जवळपास एक टक्क्यांची तेजी दिसत आहे
आयटी सेक्टरमध्ये 0.44 टक्क्यांची तेजी दिसून आली
वित्तीय क्षेत्रात 0.93 टक्क्यांची तेजी दिसत आहे. मेटल, बँकिंग शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे