आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी बाजारात खरेदीचा जोर दिसला
आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये चांगली खरेदी झाली
आज बाजार सुरू झाला तेव्हा बाजार चांगला वधारला होता
मात्र, काही वेळेनंतर नफावसुली दिसून आली.
आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 104 अंकांनी वधारला
तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टीमध्ये 34 अंकांनी वधारला असल्याचे दिसून आले
सेन्सेक्स निर्देशांक 59,793 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 17,833 अंकांवर स्थिरावला
सेन्सेक्सने 326 अंकांची तर निफ्टीने 127 अंकांची उसळी घेतली होती
त्यानंतर सुरू झालेल्या नफावसुलीने बाजारात घसरण दिसून आली
प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला होता