दिवाळीच्या सुट्टीनंतर शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीने झाली
बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.
त्यामुळे आज बाजारात तेजी राहण्याचे संकेत आहेत. सेन्सेक्स (BSE Sensex) 350 अंकांनी वधारला
निफ्टी (NSE Nifty)17800 अंकांजवळ खुला झाला.
पाडवा आणि नवीन वर्षानिमित्त शेअर बाजारातील व्यवहार बंद होते.
मंगळवारी गुंतवणूकदारांकडून नफावसुली दिसून आली.
आज गुरुवारी शेअर बाजारात खरेदीचा संकेत दिसून येत आहेत
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 59,792.32 अंकांवर खुला झाला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 17,771.40 अंकांवर खुला झाला
सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 115.65 अंकांनी वधारत 17,771.40 अंकांवर व्यवहार करत होता