आज देशभरात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे आज शेअर बाजारातील व्यवहार बंद असले तरी सायंकाळी एक तासासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आज होणारी ट्रेडिंग ही शुभ समजली जाते. लक्ष्मी पूजनानंतर एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग होते या एक तासात गुंतवणूकदार शेअर बाजारात ट्रेडिंग करतात. तर, काही गुंतवणूकदारांकडून दीर्घ मुदतीसाठी शेअर खरेदी केले जातात ब्लॉक डिल सेशन सायंकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत प्री-ओपनिंग सेशन सायंकाळी 6 ते 6.08 वाजेपर्यंत नॉर्मल मार्केट सायंकाळी 6.15 ते 7.15 वाजेपर्यंत कॉल ऑक्शन सेशन सायंकाळी 6.20 ते 7.05 वाजेपर्यंत क्लोजिंग सेशन सायंकाळी 7.15 ते 7.25 वाजेपर्यंत आज होणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.