सलग सहा सत्राच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात आज घसरण झाल्याचं दिसून आलं.
सोमवारी मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने शेअर बाजारात चांगलीच तेजी होती
पण ती कायम न राहता त्यामध्ये आज घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 287 अंकांची घसरण झाली
तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 74 अंकांची घसरण झाली
सेन्सेक्समध्ये आज 0.48 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,543 वर पोहोचला.
तर निफ्टीमध्ये 0.42 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,656 अंकांवर पोहोचला
बँक निफ्टीमध्येही आज 182 अंकांची घसरण होऊन तो 41,122 अंकांवर पोहोचला.
आज बाजार बंद होताना सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली
कॅपिटल गुड्स आणि ऑटो क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली.
एफएमसीजी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली.