शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसत आहेत
आज बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर शेअर बाजार वधारला.
सेन्सेक्सने (Sensex) 60 हजार अंकांचा टप्पा गाठला. निफ्टी (Nifty) 17,756.40 अंकांवर खुला झाला.
प्री-ओपनिंग सत्रात फारसा चढ-उतार दिसून आला नव्हता
मात्र, व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा गाठला.
सकाळी 9.31 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 233 अंकांनी वधारत 59,990.79 अंकांवर व्यवहार करत होता
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 56.95 अंकांनी वधारत 17,793.90 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे
सहा कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे
निफ्टीतील 50 पैकी 38 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे