आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Stock Market Updates) झाल्याचा दिसून आला.
आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 212 अंकाची वाढ झाली
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशाक निफ्टीमध्ये ( Nifty) 80 अंकांची वाढ झाली
सेन्सेक्समध्ये आज 0.36 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,756 अंकावर पोहोचला
निफ्टीमध्ये 0.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,737 वर पोहोचला
निफ्टी बँकमध्येही आज 176 अंकांची वाढ होऊन तो 41,299 अंकावर पोहोचला
आज शेअर बाजारात 1770 शेअर्समध्ये वाढ झाली
1548 शेअर्समध्ये घट झाली
आज 125 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही
मेटल, उर्जा आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ झाली