शेअर बाजारात आजही तेजीसह सुरुवात झाली
जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या सकारात्मक संकेताने भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे
सेन्सेक्स 59,196.96 अंकांवर खुला झाला
निफ्टी निर्देशांक 17,568.15 अंकांवर खुला
बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजी दिसून आली
सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 327 अंकांनी वधारत 59,288.54 अंकांवर व्यवहार करत होता
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 86 अंकांनी वधारत 17,573.25 अंकावर व्यवहार करत होता
सेन्सेक्समध्ये आज 30 पैकी 20 शेअरमध्ये तेजी दिसून आली
सार्वजनिक क्षेत्रातील बँका, मीडिया, ऑटो, रियल्टी आणि एनर्जी क्षेत्रात खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे
फार्मा, वित्तीय सेवा, आयटीसह स्मॉलकॅपमध्ये विक्री दिसू शकते.