डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच आहे रुपयाने मागील काही दिवसांतील ऐतिहासिक निच्चांक गाठला आहे यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की 'रुपया घसरला नसून डॉलर मजबूत होतोय.' मागील वर्षभरापासून जागतिक पातळीवर रुपया कमकुवत झाला आहे एकीकडे अर्थतज्ज्ञांनी रुपयाच्या घसरणीवर चिंता व्यक्त केली आहे तर दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे रुपयांच्या घसरणीबाबत निर्मला सितारमण यांनी म्हटलं आहे की, रुपयांच्या घसरणीकडे बघताना आपण रुपया कमकुवत होतं आहे असा विचार न करता डॉलर मजबूत होत आहे असा अर्थ लावायला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली