सकाळी घसरणीसह सुरुवात झालेला शेअर बाजार तेजीसह बंद झाला
दिवाळीच्या एक आठवड्याआधी बाजार खरेदीचा जोर दिसला
बँकिंग आणि एनर्जी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली
या सेक्टरमधील खरेदीमुळे बाजार तेजीत बंद झाला
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 492 अंकांच्या तेजीसह 58,410 अंकांवर
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 134 अंकांच्या तेजीसह 17,320 अंकांवर बंद
शेअर बाजारातील व्यवहार सकाळी सुरू झाले तेव्हा बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला होता
सुरुवातीच्या एक-दोन तासानंतर बाजार सावरू लागला
आज दिवस व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, एनर्जी, फार्मा, एफएमसीजी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला
मेटल्स, रिअल इस्टेट आणि मीडिया सेक्टरमधील शेअर दरात विक्रीचा सपाटा दिसून आला