शेअर बाजारातील तेजी आजही कायम असून सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारले आहेत.
सेन्सेक्स 123 अंकांनी वधारला असून 62820 अंकावर खुला झाला.
निफ्टीदेखील 18659 अंकांवर खुला झाला.
मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसत असून सेन्सेक्स, निफ्टीने उच्चांक गाठला.
आजही शेअर बाजारात खरेदीचे संकेत दिसून येत आहेत.
मात्र, बाजारात आज अस्थिरता राहण्याची शक्यता जाणकरांनी व्यक्त केली आहे.
बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजीत असणाऱ्या शेअर बाजारात नफावसुली सुरू झाल्याने काही वेळाने बाजारात घसरण दिसून येऊ लागली.
सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 12.83 अंकांनी वधारत 62,694.67 अंकांवर व्यवहार करत होता.
निफ्टी निर्देशांक 14.75 अंकांच्या तेजीसह 18,632.80 अंकांवर व्यवहार करत होता.
शेअर बाजारात तेजी आजही कायम, सेन्सेक्स, निफ्टीची पुन्हा ऐतिहासिक भरारी