टॉप 1

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली.

टॉप 2

मागील आठवड्यात व्यवहाराच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीचा उच्चांक गाठला होता.

टॉप 3

आज बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक पातळीवरील शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. आशियाई बाजारातही अस्थिरतेचे संकेत दिसत आहेत.

टॉप 4

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 277.29 अंकांच्या घसरणीस 62,016.35 अंकांवर खुला झाला.

टॉप 5

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82.20 अंकांच्या घसरणीसह 18,430.55 अंकांवर खुला झाला.

टॉप 6

बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाल्यानंतर काही वेळाने बाजार सावरला.

टॉप 7

सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 80 अंकांनी वधारत 62,373.67 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 8

निफ्टी निर्देशांक 21 अंकांनी वधारत 18,534.20 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 9

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 22 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली

टॉप 10

आठ कंपन्यांच्या शेअर दरात विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले