सणसमारंभासाठी तसेच आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय म्हणून सोन्याचे नाणे, चांदीचे नाणे याकडे पाहिले जाते.

अशातच बाजारात जर सोन्याचे दर कमी असतील तर ग्राहकांना या मौल्यवान धातूंची खरेदी करणे सोपे जाते.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,600 रूपयांवर आला आहे.

सोन्याच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण होत आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय.

आज चांदीचा दर देखील 500 रूपयांनी कमी झालेला आहे. एक किलो चांदीचा दर 61,490 रुपये आहे.

सोन्या-चांदीचे हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि राजधानी दिल्लीसह थोड्याफार फरकाने मागे पुढे होत असतात.

जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.35 टक्क्यांनी घसरून $1,689.01 प्रति औंस झाली.

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.

यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.