मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी जबरदस्त दिसून आला
शेअर बाजारात आज दिवसभर खरेदीचा जोर दिसून आला
बाजार बंद होताना नफावसुली झाल्याने तेजीला काहीसा लगाम लागला
शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 177 अंकांच्या तेजीसह 62,681 अंकांवर बंद झाला
निफ्टी निर्देशांक 55.30 अंकांच्या तेजीसह 18618 अंकांवर स्थिरावला.
निफ्टीत आज बाजारात व्यवहार झालेल्या 1653 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली
1717 कंपन्यांचे शेअर दर घसरले होते
147 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 15 कंपन्यांचे शेअर दर वधारले तर 15 कंपन्यांचे दर घसरले
निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 25 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते.