आशियाई बाजारातील घसरणीनंतरही आठवड्याच्या शेवटच्या
दिवशी भारतीय शेअर बाजार (Share Market) तेजीसह उघडला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 116 च्या वाढीसह 62,388 वर उघडला
तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 44 अंकांनी 18528 वर दिसत आहे.
हिरव्या चिन्हात बाजार उघडल्यानंतर लगेचच बाजारात घसरण दिसून आली.
सध्या सेन्सेक्स (Sensex) 112 अंकांच्या घसरणीसह
तर निफ्टी (Nifty) 29 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
आज शेअर बाजारात बँकिंग, इन्फ्रा आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत,
आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी या क्षेत्रांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत
निफ्टीच्या 50 शेअर्सवर नजर टाकली तर 21 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत
तर 29 शेअर्स खाली आहेत