आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती कमी अधिक फरकाने मागे-पुढे होत असतात. जागतिक बाजाराचा भारतीय बाजारावर परिणाम होत असल्याने सोन्या-चांदीच्या किंमती कमी-जास्त होत असतात.
सध्या सगळीकडे सणासुदीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीची सुरुवात केली आहे. अशातच ग्राहकांसाठी सकारात्मक बातमी आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर हे काहीसे स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी ही बातमी दिलासादायक आहे.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,770 रूपयांवर आला आहे.
तर, 1 किलो चांदीचा दर 61,850 रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे ग्राकांना सोने खरेदीची चांगली संधी आहे.
सोन्याचे दर हे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी काहीशा प्रमाणात सारखेच असताता. तर राजधानी दिल्लीतही सोन्याचे दर 48,263 या दराने व्यवहार करत आहेत.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.
तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.