आज शेअर बाजारात ऐतिहासिक उसळण दिसून आली.
सेन्सेक्सने पहिल्यांदाच 62 हजार अंकांचा टप्पा गाठला.
बँक निफ्टी निर्देशांकानेदेखील आतापर्यंतचा उच्चांक गाठला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 762 अंकांनी वधारत 62,272 अंकांवर स्थिरावला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 216 अंकांची तेजी दिसून आली
निफ्टी 18,484 अंकांवर स्थिरावला.
आज दिवसभरातील व्यवहारात 1886 कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.
त्याशिवाय, 1494 कंपन्यांचे शेअर दर घसरले.
त्याशिवाय, 133 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.