भारतीय बाजारपेठेत सध्या ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी लगबग पाहायला मिळतेय.

लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात घट झाली की ग्राहकांनाही दागिन्यांची खरेदी करणं सोपं जातं.

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान वस्तूंचे हे दर ठरत असल्या कारणाने यचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही होतो.

सोन्या-चांदीचे दर कायम ठेवत ग्राहकांसाठी आजही दिलासादायक बातमी आहे ते म्हणजे सोन्याच्या दरात आजही घट सुरुच आहे.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,700 रूपयांवर आला आहे.

1 किलो चांदीचा दर 61,940 रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे ग्राकांना सोने खरेदीची चांगली संधी आहे.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.

तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.