भारतीय शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह सुरू झाले.
कच्च्या तेलाच्या दरात घट दिसून येत असली तरी बाजारात तेजीचा जोर दिसत आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देंशांक सेन्सेक्स 157 अंकांच्या तेजीसह 61,667 अंकावर खुला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 58 अंकांच्या तेजीसह 18326 अंकांवर खुला
सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेनसेक्स 175 अंकांनी वधारत 61,686.12 अंकावर व्यवहार करत होता
निफ्टी 51 अंकांच्या तेजीसह 18,318.95 अंकावर व्यवहार करत होता
शेअर बाजारात मेटल्स क्षेत्र वगळता इतर सर्व सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे
बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, इन्फ्रा, एफएमसीजी, एनर्जी सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे
स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरचे दरही वधारले आहेत
निफ्टी 50 मधील 39 कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत