बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) दररोज कमी-जास्त होत असतात.

मात्र, आज बाजारात सोन्याचे दर पाहिल्यास हे दर काहीसे स्थिर आहेत.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,810 रूपयांवर आला आहे.

बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, एक किलो चांदीचा दर 62,380 रुपये आहे.

चांंदीच्या दरात 500 रूपयांच्या फरकाने किंचित वाढ झाली आहे.

सोन्याचे दर हे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह अन्य ठिकाणीही सारखे आहेत.

त्यामुळे ग्राहकांना सोने-चांदी खरेदीसाठी चांगली संधी आहे.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.

यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.