सोमवारी झालेल्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज खरेदी जोर दिसत असून निर्देशांक वधारला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 94 अंकांच्या तेजीसह 61,234 अंकावर खुला झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 21 अंकांच्या तेजीसह 18,180 अंकांवर खुला झाला.
आज, पेटीएम कंपनीच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली.
बाजारातील व्यवहारांना आज सुरुवात झाल्यानंतर बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, इन्फ्रा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.
आयटी, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे.
सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 170 अंकांच्या तेजीसह 61,315.47 अंकांवर व्यवहार करत होता.
निफ्टी 52.40 अंकांच्या तेजीसह 18,212.35 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 22 कंपन्यांचे शेअर वधारले.
आठ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.