काही दिवसांपूर्वीच जागतिक बाजारपेठेतील वाढीमुळे सोन्याचे दराने तब्बल 53 हजारांचा टप्पा पार केला होता. आज मात्र, सोन्याचे दर किंचित कमी झाले आहेत. आज सोन्याचे दर 300 ते 400 रूपयांच्या फरकाने कमी झाले आहेत. चांदीच्या दरात सुद्धा 300 रूपयांची घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीसाठी किंचित दिलासा मिाळाला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, एक किलो चांदीचा दर 61,080 रुपये आहे. सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,780 रूपयांवर आला आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये सोन्याचे दर देखील 52 हजारांच्या दरातच आहेत.