मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात जी वाढ झाली होती. त्यामध्ये आज किंचीत फरकाने घट झाली आहे



लग्नमुहूर्ताचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय.



मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता.



आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, तर, एक किलो चांदीचा दर 60,660 रुपये आहे.



सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,630 रूपयांवर आला आहे.



सोन्याचे हे दर मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूरमध्ये देखील सारखेच आहेत.



त्यामुळे ग्राहकांना आज सोने खरेदी किंचित फरकाने फायदेशीर ठरू शकते.



BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.



यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.