टॉप 1

भारतीय शेअर बाजारात आज घसरणीसह सुरुवात झाली आहे

टॉप 2

जगभरातील शेअर बाजारात दिसून आलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला

टॉप 3

सेन्सेक्स 170 अंकांच्या घसरणीसह 61,812 अंकांवर खुला झाला

टॉप 4

तर, निफ्टी 51 अंकांच्या घसरणीसह 18,358 अंकांवर खुला झाला आहे.

टॉप 5

बाजारात सुरुवातीच्या घसरणीनंतर पुन्हा खरेदीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्स निर्देशांक वधारला होता.

टॉप 6

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33.39 अंकांच्या घसरणीनंतर 61,947.33 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 7

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 25.50 अंकांच्या घसरणीसह 18,384.15 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 8

बाजारात आजही अस्थिरता दिसण्याची शक्यता आहे.

टॉप 9

सेन्सेक्समधील 30 पैकी 13 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसत असून 17 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसत आहे

टॉप 10

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.