आज दिवसभरात शेअर् बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली
शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली असली तरी बाजार बंद होताना मात्र तो काहीसा सावरल्याचं दिसून आलं
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 107 अंकांनी वाढला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6 अंकांनी वाढला
सेन्सेक्समध्ये आज 0.17 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,980 अंकावर स्थिरावला
निफ्टीमध्ये 0.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,409 अंकांवर स्थिरावला
बँक निफ्टीमध्येही 162 अंकांची वाढ होऊन तो 42,535 अंकांवर स्थिरावला.
आज बाजार बंद होताना एकूण 1394 शेअर्समध्ये वाढ झाली
2011 शेअर्समध्ये घट झाली. तर एकूण 115 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 20 पैशांनी घसरली