जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स आणि रिटेल कंपनी ॲमेझॉन 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.



मीडिया रिपोर्टनुसार, ॲमेझॉन सर्वात मोठी नोकरकपात करणार आहे.



गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बड्या कंपन्यांकडून अचानक झालेल्या नोकरकपातीमुळे सर्वांनाच धक्का बसला.



त्यानंतर आता ॲमेझॉनही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यापासून कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात येईल.



मायक्रोसॉफ्ट, नंतर ट्विटर आणि त्यानंतर फेसबुकची मालकी असलेली मेटा या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं आहे.



ट्विटरने या आठवड्याच्या सुरुवातीला सुमारे चार हजारहून अधिक कॉन्ट्रॅक्टवरील कर्मचाऱ्यांना काढून टाकलं.



Facebook ची मालकी असलेल्या मेटा कंपनीनं 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं.



सुत्रांच्या माहितीनुसार, ॲमेझॉन कंपनीला नुकसान सहन करावं लागतं आहे. ॲमेझॉन कंपनीच्या विक्रीमध्ये घट झाली आहे, त्यामुळे कंपनी खर्च करण्याच्या तयारीत आहे.



ॲमेझॉन कंपनीने 10 हजार कर्मचारी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी नोकरकपात असणार आहे.



ॲमेझॉन कंपनी जगभरात 1.6 मिलियन लोकांना रोजगार देते.