भारतात लग्नसराईच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली.



सोन्या-चांदीचे दर स्थिर नसले तरी याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होतो.



गेल्या 24 तासांत पाहता सोन्याच्या दरात किंचित फरकाने वाढ झाली आहे.



मात्र, आज चांदीचे दर कमी झालेले पाहायला मिळतायत.



आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,090 रूपयांवर आला आहे.



आज एक किलो चांदीचा दर 62,100 रुपये आहे.



स्पॉट सोने 0059 GMT नुसार प्रति औंस $1,633.69 वर लिस्टलेस होते, यापूर्वी 21 ऑक्टोबरपासून सर्वात कमी पातळी गाठली होती.



BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.



यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.



इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.