भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज घसरणीसह झाली
सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांत घसरण दिसून आली
मात्र, त्यानंतर बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसून आला
त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले. प्री-ओपनिंग सत्रातही घसरण नोंदवण्यात आली.
आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 164.36 अंकांच्या घसरणीसह 61,708.63 वर खुला झाला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 5.15 अंकांच्या घसरणीसह 18,398.25 अंकांवर व्यवहार करत होता
सेन्सेक्समधील 30 पैकी 13 शेअर्समध्ये तेजी दिसून आली
17 शेअर्समध्ये घसरण होती. निफ्टीत 21 कंपन्यांच्या शेअर दरात तेजीसह व्यवहार सुरू होता
29 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली.
सकाळी झालेल्या घसरणीनंतर बाजारात तेजी दिसून आली