शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला
सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे
आज मुबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 843 अंकांची घसरण झाली
सेन्सेक्समध्ये आज 1.46 टक्क्यांची घसरण होऊन तो 57.147 अंकांवर खाली आला
निफ्टीमध्ये 1.49 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,983 अंकांवर पोहोचला
बँक निफ्टीमध्येही आज 380 अंकांची घसरण झाली असून तो 38,712 अंकांवर पोहोचला.
आज शेअर बाजार बंद होताना एकूण 1036 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
तर 2291 कंपन्यांचे शेअर्स घसरले. आज 133 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही
Axis Bank, Adani Enterprises आणि Asian Paints या निफ्टीमध्ये काहीशी वाढ
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही एका टक्क्याहून अधिकची घसरण