भारतीय शेअर बाजारातील व्यवहारांवर आज नफावसुलीचा दबाव दिसत आहे!
प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीत (Nifty) घसरण झाल्याचे दिसून आले
मात्र, बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीचा जोर दिसल्याने बाजार सावरला.
सेन्सेक्स घसरणीसह (Sensex Fall) खुला झाला. तर निफ्टी किंचिंत वधारत खुला झाला
जागतिक पातळीवरील शेअर बाजारातून भारतीय शेअर बाजाराला (India Share Market) फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून आले.
सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) सेन्सेक्स 29.18 अंकांच्या घसरणीसह 61,765.86 अंकांवर खुला झाला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (NSE) निफ्टी 26.70 अंकांनी वधारत 18,376.40 अंकांवर खुला झाला.
सकाळी 10.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 46.43 अंकांच्या घसरणीसह 61,748.61 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी निर्देशांक 14.30 अंकांच्या तेजीसह 18,364.00 अंकावर व्यवहार करत होता.