शेअर बाजारातील व्यवहार आज तेजीसह सुरू झाले. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारले.
बँक निफ्टी (Bank Nifty) निर्देशांकाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून 42000 अंकांनजिक खुला झाला.
बाजार सुरू झाल्यानंतर मात्र विक्रीचा दबाब दिसून आल्याने निर्देशांकात काही प्रमाणात घसरण झाली.
बँक निफ्टीने ऑलटाइम उच्चांक गाठला. बँक निफ्टी 0.35 टक्क्यांनी वधारत 41832 अंकांच्या पातळीवर खुला झाला.
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 119.4 अंकांनी वधारत 61,304.29 अंकांवर खुला झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 85.45 अंकांच्या तेजीसह 18,288 अंकांवर खुला झाला.
सकाळी 10.25 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 3 अंकांच्या घसरणीसह 61,181.70 अंकांवर व्यवहार करत होता.
निफ्टी निर्देशांक 7.40 अंकांनी वधारत 18,210.20 अंकांवर व्यवहार करत होता.
शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज तेजीसह झाली असली तरी बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे
शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; सेन्सेक्स वधारला, बँक निफ्टीची उच्चांकी भरारी