भारतीय शेअर बाजारात गुरुवारी घसरण दिसून आली.
जागतिक पातळीवर शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
आज शेअर बाजारात नफावसुली झाल्याने निर्देशांकात घसरण झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 419 अंकांच्या घसरणीसह 61 हजार अंकांच्या खाली घसरून 60,613 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनिर्देशांक 120 अंकांच्या घसरणीसह 18,036 अंकांवर बंद झाला.
आज बाजारात झालेल्या घसरणीत सर्व सेक्टरमध्ये घसरण दिसून आली.
बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, फार्मा, मेटल्स, एनर्जी, मीडिया, रिअल इस्टेट सेक्टरमध्ये घसरण दिसून आली.
निफ्टी 50 तील 12 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली.
38 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
सेन्सेक्समधील 30 पैकी 7 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली.