भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे.
सेन्सेक्स 61 हजार अंकाखाली घसरला. निफ्टीचीही घसरणीसह सुरुवात झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 323 अंकांच्या घसरणीसह 60,709 अंकावर खुला झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 90 अंकांच्या घसरणीसह 18,066 अंकांवर खुला झाला.
सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 463 अंकांच्या घसरणीसह 60,569.83 अंकांवर व्यवहार करत होता.
निफ्टी 134 अंकांच्या घसरणीसह 18,022.05 अंकांवर व्यवहार करत होता.
बाजारात विक्रीचा सपाटा दिसून येत आहे.
फार्मा सेक्टरमध्ये तेजी दिसत असून इतर सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे.
बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, मीडिया, रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून येत आहे.
निफ्टी 50 मधील 19 कंपन्यांचे शेअर तेजीत दिसत असून 21 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे.