गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर कमी झाले असतानाच आज सकाळपासूनच सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे.



याचं कारण म्हणजे, जागतिक बाजारात महागड्या धातूंच्या किमतीत झालेल्या दरवाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला.



या कारणामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय.



आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,950 रूपयांवर आला आहे.



एक किलो चांदीच्या दरानेदेखील 60 हजारांचा आकडा पार केला आहे.



मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह कोलकत्ता आणि दिल्लीतही सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे.



तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.



तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.