तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्त, समारंभांना तसेच इतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते. या निमित्ताने ग्राहकांची बाजारपेठांत लगबग पाहायला मिळते. सोन्या-चांदीचे दर मागच्या आठवड्यात काहीसे अस्थिर होते. त्यानुसार आजही सोन्या-चांदीच्या दरात काहीशी वाढ झालेली पाहायला मिळतेय. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 51,000 रूपयांवर आला आहे. एक किलो चांदीचा दर 60,430 रुपये आहे. सोन्याचे हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह अन्य शहरांतदेखील लागू आहेत. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.