आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात किंचित उसळी पाहायला मिळाली.
संमिश्र जागतिक संकेतांमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 102 अंकांच्या वाढीसह 60,936 वर उघडला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 37 अंकांच्या वाढीसह 18,090 अंकांवर उघडला.
आशियाई देशांच्या शेअर बाजारात एकीकडे घसरण सुरू असतानाही भारतीय शेअर बाजारात किंचित उसळण पाहायला मिळत आहे.
मेटल्स, बँक, ऑटो, रिअल इस्टेट मीडिया, एनर्जी सेक्टरचे शेअर्स वधारताना दिसत आहेत.
दुसरीकडे, आयटी, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सची विक्री सुरू आहे.
सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत,
निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 33 शेअर्स वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह अंकांवर व्यवहार करत आहे.
आज शेअर बाजारात पुढील कंपन्यांच्या शेअर्स दरात वाढ झाली आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आज बँकिंग शेअर्स तेजीत राहू शकतात