आज भारतीय शेअर बाजारात दिवसभर विक्रीचा दबाव दिसून आला.
सकाळी घसरणीसह सुरुवात झालेला शेअर बाजार काही प्रमाणात सावरला.
बँक निफ्टी (Bank Nifty) निर्देशांक आज तेजीसह बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 69.68 अंकांच्या घसरणीसह 60,836 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30.15 अंकांच्या घसरणीसह 18,052 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 1431 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
1359 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
बँक निफ्टीतही विक्रीच्या दबावाने घसरण झाली होती.
त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने बँक निफ्टी एक टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला.
आयटी सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. मेटल शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला.