आज भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून नफावसुलीचे संकेत दिसून येत आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स किंचीत घसरणीसह आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची निर्देशांक निफ्टी (Nifty) 23 अंकांच्या तेजीसह खुला
आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 62,865.28 अंकांवर खुला
निफ्टी निर्देशांक 18,719.55 अंकावर खुला
सकाळी 10.05 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 326.11 अंकांच्या घसरणीसह 62,542.39 अंकांवर व्यवहार करत होता.
निफ्टी निर्देशांक 97.55 अंकांच्या घसरणीसह 18,598.55 अंकांवर व्यवहार करत होता
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी फक्त चार कंपन्यांचे शेअर दर तेजीत आहेत.
उर्वरित 26 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
टाटा स्टील, इंडसइंड बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतही विक्रीचा जोर दिसून येत आहे